गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन
सार्वजनिक आरोग्य विभाग
शासन निर्णय
क्रमांकः प्रशामा १२२३/प्र.क्र.४७१/आरोग्य ७
१० वा मजला, गोकुळदास तेजपाल रूग्णालय संकूल इमारत नवीन मंत्रालय, मुंबई ४०० ००१.
दिनांक: २६ ऑगस्ट, २०२४
आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था व ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यांमध्ये आरोग्यासंदर्भात जागरुकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्साहन, निर्माण करण्याच्या दृष्टीने "आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक" महत्वपूर्ण सामाजिक दुवा म्हणून कार्यरत आहेत. राज्यातील आशा स्वयंसेविकांचा माता आरोग्य, बाल आरोग्य, कुटुंब नियोजन इत्यादी साठी नियमित गृहभेटी देणे, माता व बालकांना मार्गदर्शन करणे, रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र / ग्रामीण रुग्णालय / उपजिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय येथे संदर्भीत करणे अशा प्रकारची कर्तव्ये बजावावी लागतात. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या कामाचे स्वरूप विचारात घेवून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू आल्यास रु.१०.०० लक्ष व कायमस्वरुपी अंपगत्व आल्यास रु ५.०० लक्ष इतके सानुग्रह अनुदान देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
सदर माहिती व्हिडीओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
शासन निर्णय :-
01. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा कर्तव्य बजावत असताना अपघाती मृत्यू झाल्यास रु.१०.०० लक्ष व कायमस्वरुपी गत्व आल्यास रु.५.०० लक्ष इतक्या रकमेचे सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०२. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना सानुग्रह अनुदान लागू करण्यासाठी प्रति वर्ष अंदाजित रु.१.०५ कोटी इतका आवर्ती निधी मंजुर करण्यात येत आहे.
०३. प्रस्तावित वाढ ०१ एप्रिल, २०२४ पासुन लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ०४. यासाठी आवश्यक असणारा निधी आगामी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
०५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२४०८१९१५०७४७४६१७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
सदर माहिती व्हिडीओ स्वरूपात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://www.youtube.com/@shritejmarathi
अधिक माहिती व अशाच माहिती साठी युटयुब चॅनल सबक्राईब करा....
https://www.youtube.com/watch?v=N3buz5Podm8
इतर माहिती-
पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार का ?