आता एका मिसकॉलवर मिळणार मुख्यमंत्री सहायता निधीतून लाखोची मदत.

आता एका मिसकॉल करा आणि मिळवा मुख्यमंत्री सहायता निधीतून लाखोची मदत mH Chief Minister help fund

                                                    

         महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे उद्दिष्ट आहे. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” cm help fund' Chief Minister' help fund मार्फत अर्थसहाय्य पुरविले जाते.

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठीही या निधीतून अर्थसहाय्य पुरविले जाते. cm help fund' Chief Minister help fund

मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी आता फक्त मिस कॉल देण्याची आवश्कता आहे. याआधी हा निधी मिळण्यासाठी किचकट आणि वेळकाढूपणा प्रक्रिया होती. त्यामुळे अनेक गरजू या सेवेपासून वंचित राहत होते. मात्र, आता फक्त एका मिस कॉलवर तुम्हाला मुख्यमंत्री सहायता निधी मिळणार आहे.

CMRF:– 

          मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी आर्थिक मदत दिली जाते. अर्ज भरण्यासाठी अनेकदा विविध अडचणी येतात. ग्रामीण भागात अनेक समस्यांचा सामना अर्जदारांना करावा लागतो. राज्य सरकारने ही गंभीर बाब लक्षात घेत, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८६५०५६७५६७ हा मोबाइल क्रमांक देऊन केवळ मिसकॉलचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री सहायता निधी करिता वेळकाढू प्रक्रियेतून आता सहज, सोप्या आणि कमी वेळात निधी मिळेल. लाभार्थ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

गरजूंना होणार फायदा:– 

          निरोगी आरोग्य, शारीरिक उपचार, शस्त्रक्रिया इत्यादीसाठी शासनामार्फत नागरिकांसाठी विविध योजना राबवते. पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात आदी नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित होणाऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी मार्फत अर्थसहाय्य दिले जाते. तसेच आर्थिक दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार, शस्त्रक्रियेसाठी अर्थसहाय्य पुरविले जाते. विविध दुर्धर आजारांवरील उपचार, शस्त्रक्रियांसाठी आजवर ८ हजार रुग्णांकरीता ६० कोटी ४८ लाख इतका मदतनिधी मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून वाटप करण्यात आला. प्रति महिना दीड ते दोन हजार अर्ज वैद्यकीय मदतीसाठी दाखल होतात, पैकी १ हजार अर्ज मंजूर होतात. अर्ज दाखल केल्यानंतर केवळ ७ दिवसांत वैद्यकीय मदत संबंधित रुग्ण दाखल असणाऱ्या रुग्णालयाच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येते.

मुख्यमंत्री सहायता निधीचे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी 


मुख्यमंत्री सहाय्यता निधी

                                                                  Google मध्ये Search करा

लवकरच अँप बनवणार:– 

          मुख्यमंत्री सहायता निधीसाठी येणारे बहुतांश अर्ज अपूर्ण स्वरूपात असतात. मदत करण्यास अडचणी येतात. सध्या मिसकॉल वर ही सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी लवकरच मुख्यमंत्री सहायता निधी अर्जासाठी अॅप बनवले जाणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल आणि एकाच वेळी तिथे सर्व माहितीचे अर्ज स्वीकारले जातील. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मदत कक्षाशी संपर्क साधावा लागणार नसल्याचे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

अशी असेल प्रक्रिया:–

                 ग्रामीण भागातील गरजूंना निधीसाठी मंत्रालयाचे दरवाजे झिझवावे लागतात. अनेकदा अर्ज भरताना चुका झाल्यास नव्याने प्रक्रिया करावी लागते. उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची होणारी परवड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, लक्षात घेऊन लाभार्थ्यांना थेट मिसकॉलवर अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून दिली आहे. अर्जदाराने ८६५०५६७५६७ या मोबाईल क्रमांकावर मिसकॉल केल्यानंतर अर्जाची लिंक एसएमएसद्वारे प्राप्त होईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर डाऊनलोड होणाऱ्या अर्जाची प्रिंट काढून तो भरावा. रुग्णाच्या आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा स्कॅन करून पीडीएफमध्ये cmrf.maharashtra.gov.in या ईमेल आयडीवर अपलोड करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे.

कर्करोगावरील उपचारांसाठी सर्वाधिक अर्ज:– 

             मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कर्करोगावरील उपचाराच्या मदतीसाठी सर्वाधिक अर्ज येतात. एकूण अर्जांच्या एकूण २५ टक्के अर्ज असून त्या खालोखाल हृदयविकार, गुडघा प्रत्यारोपण, खुबा प्रत्यारोपण, अपघात, डायलिसिस, किडनीविकार उपचारांच्या मदतीसाठी अर्ज येत आहेत. भाजलेल्या तसेच शॉक लागलेल्या रुग्णांकडून देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अर्ज येत आहेत. 

मुख्यमंत्री सहायता निधीचे उद्दिष्टे:-
  • शासन निर्णय क्रमांक सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि. १५/११/२००१ अन्वये या निधीची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत -राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.
  • जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
  • शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
आत्ता हे पण  वाचा -

शासन आपल्या दारी उपक्रमातंर्गत ‘या’ योजना राबविण्यात येणार…

Post a Comment (0)
Previous Post Next Post