महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागांच्या भरती बाबत उपडेट

महापारेषण सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागांच्या भरती बाबत. 

            सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाची १०० टक्के रिक्त पदे सरळसेवा भरतीन्वये भरण्याकरीता दि. ११.०५.२०२३ रोजी महाव्यवस्थापक (मासं-मबनि), उप महाव्यवस्थापक (मासं-मबनि) व सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं- सेप्र) यांनी क्षेत्रिय कार्यालयातील सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) व व्यवस्थापक (मासं), भार प्रेषण केंद्र, ऐरोली यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेवून सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाच्या सामाजिक व समांतर आरक्षणासह रिक्त पदांची विभागनिहाय व परिमंडलनिहाय एकत्रित केलेली माहिती सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं- सेप्र) https://www.mahatransco.in/ यांच्याकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते. mahapareshan bharti update-2023


                       त्याप्रमाणे, सर्व परिमंडल कार्यालयांकडून दि. १७.०५.२०२३ पर्यंत प्राप्त झालेल्या माहितीचे संकलन केल्यानंतर, परिमंडलनिहाय सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाच्या रिक्त पदांची स्थिती खालीलप्रमाणे दिसुन आली आहे. त्यानुसार, सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) या पदाची खालीलप्रमाणे एकूण १८६८ रिक्तपदांची माहिती प्राप्त झाली आहे.

सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) हे पद विभागस्तरीय सेवा जेष्ठता यादीमध्ये येणारे पद आहे. सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) हे पद सरळसेवेने भरावयाचे पद असून सदर पदाची जाहिरात 
https://www.mahatransco.in/ या वेबसाईटवर  प्रकाशित करुन रिक्तपदे भरावयाच्या अनुषंगाने या पदाच्या रिक्तपदांच्या सामाजिक व समांतर आरक्षण निहाय (जसे की महिला, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भुकंपग्रस्त, खेळाडु, अपंग, अनाथ) अचुक माहिती सादर करणे आवश्यक आहे.

पदभरती बाबत खालील झालेल्या बैठीकीतील सूचना-

                 सबब, आपणांस विनंती करण्यात येते की, आपल्या परिमंडल कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या रिक्त पदांची, सामाजिक अनुशेषाची व समांतर आरक्षणाची विभागीय कार्यालय स्तरावरील आणि परिमंडल स्तरावरील एकत्रित माहितीची परत एकदा खात्री करुन घ्यावी व ती सोबत जोडलेल्या प्रपत्रात प्रमाणित करून उलट टपाली पत्राद्वारे दि. २२.०५.२०२३ पर्यंत निम्न स्वाक्षरीधारकास पाठवावी. 'mahatransco' असे आदेश देण्यात आले आहेत.

खालील प्रमाणे रिक्त पदाची विभाग निहाय माहिती प्राप्त झाली आहे.

उदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, औरंगाबाद – ३३८

अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, नागपूर – २४

अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, नाशिक – ३१७

अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, पुणे – ४३२

अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, कराड – ३४५

अउदा प्रकल्प नि संवसु परिमंडल, वाशी – ३१३

भार प्रेषण केंद्र, ऐरोली – ०९

एकूण – १८६८

महापारेषणच्या अधिकृत mahatransco संकेतस्थळास भेट देण्यासाठी - येथे क्लिक करा.


वरील पदासाठी जाहिरात लवकरच येणार असल्याचे महापारेषण कडून सांगण्यात आले आहे.

महापारेषण बाबत अधिक माहिती- 

अंमलबजावणीअंतर्गत MSETCL- पुढाकार:-

            महापारेषणने नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (एनआरएससी), नागपूर, इस्त्रो यांच्या सहकार्याने वेब-आधारित भौगोलिक माहिती प्रणाली (वेब-जीआयएस) विकसित केली आहे. यामध्ये ईएचव्ही सबस्टेशन्स तसेच २२० के.व्ही. स्तरापर्यंतचे वाहिनी व मनोरे आहेत. विकसित केलेले वेब-जीआयएस पोर्टल, जे पूर्णपणे अंतर्गत आणि विनामूल्य विकसित केले गेले आहेत. ते १८.०९.२०१७ पासून कार्यरत आहे आणि महापारेषणच्या सर्व कर्मचार्‍यांना वापरासाठी उपलब्ध आहे.

             राजूर आणि चांदवड येथे विना कर्मचारी चालणारी (Unmanned) आणि दूरवरून नियंत्रण करण्याजोगी (Remote Control) वीज उपकेंद्रे प्रायोगिक तत्त्वावर महापारेषणने कार्यरत केली आहेत.
भौगोलिक माहिती प्रणाली वीज उपकेंद्रे (GIS S/S) भांडूप (मुंबईनजीक) व रास्तापेठ (पुणे) येथे कार्यान्वित करण्यात आली आहेत. हिंजेवाडी (पुणेनजीक) येथील काम प्रगतिपथावर आहे.

आता हे पण वाचा-


Post a Comment (0)
Previous Post Next Post