ZP Bharti 2023 Educational Qualification Details postwise:ZP Bharti 2023 Educational Qualification Details postwise:

 

जिल्हा परिषद शेक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे. ZP Bharti 2023 Educational Qualification Details postwise:

zp all bharti-२०२३


  • आरोग्य पर्यवेक्षक – 
  • ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केले असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल.

  • आरोग्य सेवक (पुरुष) ४०% –
  • विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचान्यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.

  • आरोग्य सेवक (पुरुष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – |
  •  विज्ञान विषय घेवून माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार, राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणुन २० दिवसांचा अनुभव धारकांना प्राधान्य देण्यात येईल. ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचा-यांसाठी असणारा १२ महिन्याचा मुलभूत पाठयक्रम | यशस्वीरित्या पूर्ण केलेला नसेल तर अशा उमेदवारांनी सदर प्रशिक्षण नियुक्ती नंतर तीन संधीत यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहिल.

  • (आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) –
  •  ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

  • आरोग्य परिचारिका (आरोग्य सेवक (महिला)) –
  •  ज्यांची अर्हता प्राप्त साह्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील.

  • औषध निर्माण अधिकारी – 
  • औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषध शाळा अधिनियम १९४८ खालील नोंदणीकृत औषध निर्माते असलेले उमेदवार

  • कंत्राटी ग्रामसेवक – किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान ६० % गुणांसह उत्तीर्ण किंवा शासन मान्य संस्थेची अभियंत्रिकी पदविका (तीन वर्षाचा अभ्यासक्रम) किंवा शासन मान्य संस्थेची समाजकल्याणची पदवी (बी एस डब्ल्यु) किंवा माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य महंता आणि कृषि पदविका दोन वर्षाचा अभ्यासक्रम किंवा कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणाऱ्या किंवा समाजसेवेचा अनुभव आणि ग्रामीण अनुभव असलेले उमेदवारांना अधिक पसंती
    संगणक हातळणी वापराबाबत माहिती तंत्रज्ञान संकलनालयाने वेळोवेळी विहित केलेली परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र धारण कर आवश्यक राहील.

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) विधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा – स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका | तीन वर्षाचा पाठक्रम किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार

  • कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी – यंत्र अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका (तीन वर्षांचा पाठयक्रम) किंवा तुल्य अर्हता धारण करत असतील असे उमेदवार

  • कनिष्ठ आरेखक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र झालेले असतील किंवा तुल्य अर्हता धारण करीत असतील आणि ज्यांनी शासनाने मान्यता दिलेला स्थापत्य आरेखकाचा क्रमशस्वीरित्या पूर्ण केला असेल असे उमेदवार

  • कनिष्ठ यांत्रिक – ज्यांनी तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील अल्पमुदत्ताचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल किंवा समतुल्य अर्हता धारण करीत असतील असे उमेदवार आणि
    फळ मार्ग किंवा वाफेचर किया तेलावर चालणारे (लोड रोलर दुरुस्त

  • कनिष्ठ लेखाधिकारी – ज्यांनी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केली असेल व कोणतेही | सरकारी कार्यालय व्यापारी भागीदार संस्था अथवा स्थानिक प्राधिकरण यातील किमान ५ वर्षाचा अखंड सेवेचा ज्यांना अनुभव असेल अशा उमेदवारामधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. या बाबतीत लेखाशास्त्र आणि लेखा परीक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्यांना अथवा प्रथम वा व्दितीय वर्गातील पदवी धारण करणा-यांना अधिक पसंती दिली जाईल किंवा गणित अथवा सांख्यिकी अथवा लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे प्रमुख विषय घेऊन पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील अशा उमेदवारांमधुन नामनिर्देशनाव्दारे नेमणुक करण्यात येईल. याबाबतीत कोणत्याही सरकारी कार्यालयातील अथवा व्यापारी संस्थेतील अथवा स्थानिक प्राधीकरणातील लेखा कार्याचा अनुभव असणाऱ्यास अधिक पसंती दिली जाईल.

  • कनिष्ठ सहाय्यक – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांनी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी अनुक्रमे मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे दर | मिनीटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील असे उमेदवार परंतू असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
    महाराष्ट्र शासन, ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील शासन निर्णय दिनांक ०६ जानेवारी १९९७ नुसार मराठी टंकलेखन आवश्यक राहील. परंतु उक्त दोन भाषांपैकी मराठी भाषेतील गतीच्या प्रमाणपत्रानुसार नियुक्त केलेले उमेदवार, नियुक्त केलेल्या तारखेपासून दोन वर्षांच्या कालावधीत इंग्रजी भाषेतील दर मिनीटास ४० शब्दांहून कमी नाही अशा टंकलेखनाच्या गतीचे प्रमाणपत्र मिळवतील असे उमेदवार

  • कनिष्ठ सहाय्यक लेखा  माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार तसेच महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या एतदर्थ मंडळाने किंवा आयुक्त, शासकीय परीक्षा विभाग, शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांनी मराठी टंकलेखनाचे दर मिनिटास ३० शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करीत असतील किंवा | टंकलेखनामध्ये ५० टक्के गुण मिळवून माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
    परंतू असे की, इंग्रजी विषय घेऊन माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या किंवा इतर भाषेतील टंकलेखनाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.
    तसेच लेखाविषयक कामकाजाचा पूर्वानुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

  • जोडारी – जे उमेदवार चौथी उत्तीर्ण झाले असतील ज्यांना किमान दोन वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असेल, शासकीय तंत्र शाळेतून | विहित केलेला जोडाऱ्याचा पाठ्यक्रम किंवा तुल्य पाठ्यक्रम उत्तीर्ण झाले असतील.

  • मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – ज्या महिला उमेदवारांनी एखाद्या संविधिक विद्यापीठाची, खास करून समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक ही पदवी धारण केलेली आहे. तसेच महिला व बालविकास विभागाकडील शासन अधिसूचना दि. ०४ जून २०२१ नुसार ज्यांनी पदवी धारण केली असेल असे उमेदवार

  • पशुधन पर्यवेक्षक – (दोन) (अ) संविधिक विद्यापीठाची, पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करीत असलेल्या व्यक्ती किंवा (ब) पशुधन पर्यवेक्षक, पशुपाल, पशुधन सहाय्यक, सहायक पशुधन विकास अधिकारी किंवा पशुधन विकास अधिकारी (ब श्रेणी) या बाबतची पशुसंवर्धन संचालनालयाने दिलेली पुढील पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करणा-या व्यक्ती. (१) त्यावेळच्या मुंबई राज्याने चालविलेल्या अभ्यासक्रमासह, पशुवैद्यक पशुपाल प्रशिक्षण अभ्यासक्रम (२) पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि राज्यातील विविध संविधीक कृषि विद्यापीठे यांनी चालविलेल्या पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम (३) पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी चालविलेला पशुवैद्यक व पशुसंवर्धन शास्त्रामधील दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम (आणि), (४) खालील संस्थांनी चालविलेला पशुवैद्यक शास्त्र विषयासह दुग्धशाळा व क्षेत्र व्यवस्थापन व पशुसंवर्धन पदविका या मधील दोन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम. (एक) महाराष्ट्र तंत्रशिक्षण परीक्षा मंडळ, किंवा (दोन) राज्यातील विविध संविधीक कृषी विद्यापीठे किंवा किंवा ५) महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्यामार्फत चालविण्यात येणारा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम उत्तीर्ण| माहिती तंत्रज्ञान संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्याकडून वेळोवेळी विहित केलेले संगणक वापराबाबतचे प्रमाणपत्र धारण केलेले असावे.

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ज्याने मुख्य विषय म्हणुन भौतीकशास्त्र किंवा रसायनशास्त्र अथवा जीवशास्त्र किंवा वनस्पतीशास्त्र अथवा प्राणीशास्त्र किंवा सुक्ष्म जीवशास्त्र यासह विज्ञान विषयामध्ये पदवी धारण केली असेल अशा उमेदवारातून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. (परंतु हाफकिन संस्थेच्या वैद्यकिय प्रयोगशाळा तंत्रशास्त्रामध्ये पदविका धारण करीत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)

  • यांत्रिक – शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी अथवा शासनाने तिच्याशी समतुल्य म्हणून जाहीर केलेली अन्य कोणतीही अर्हता असावी त्याच्याकडे शासनाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था अथवा मान्यता प्राप्त संस्था मधील यांत्रिक विद्युत अथवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी मधील प्रमाणपत्र असावे. वरील नमूद केलेली शैक्षणिक अर्हता संपादन केल्यानंतर त्यास | ऑटोमोबाईल व न्यूमॅटिक मशीनच्या देखभाली व दुरुस्तीचा १ वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा. तो जड वाहन चालविण्याचा वैद्य परवाना धारक असावा. परंतू विहित | केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्त अथवा ही दोन्हीही असाधारण अर्हता किंवा असाधारण अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या शिफारशीनुसार शिथील करू शकेल.

  • रिगमन (दोरखंडवाला) – शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण अथवा तिच्याशी समतुल्य जाहिर शैक्षणिक अर्हता आणि जड माल वाहन अथवा जड प्रवासी वाहनाचा, जड वाहन कामाचा वैध परवानाधारक असेल तर त्यास जड माल वाहनाचा अथवा जड प्रवासी वाहनाचा चालविण्याचा एक वर्षापेक्षा कमी अनुभव नसावा.| ज्यांच्याकडे विंधन यंत्राद्वारे खुदाईचा २ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य.| परंतू विहित केलेली वयोमर्यादा अथवा अनुभव संवर्गाची शर्त अथवा ही दोन्हीही असाधारण अर्हता किंवा असाधारण अनुभव किंवा दोन्ही धारण करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत शासन निवड मंडळाच्या
    शिफारशीनुसार शिथील करू शकेल.

  • वरिष्ठ सहाय्यक – संविधिमान्य विद्यापीठाची पदवी प्रमाणपत्र धारण करणारे उमेदवार

  • वरिष्ठ सहाय्यक लेखा – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करीत असतील या बाबत लेखा शास्त्र व लेखा परिक्षा हे विशेष विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणा-या अथवा पहिल्या किंवा दुस-या वर्गातील पदवी धारण करणा-या आणि कोणत्याही सरकारी कार्यालयात अथवा व्यापारी संस्थेत अथवा स्थानिक प्राधिकरणात तीन वर्षाहून कमी नसेल इतक्या अखंड कालावधी पर्यंत लेखा विषयक कामांचा पदवी नंतरचा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या उमेदवारांना अधिक पसंती दिली जाईल.

  • विस्तार अधिकारी (कृषि) – ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कृषि विषयातील पदवी किंवा इतर कोणतीही अर्हता धारण केली असेल अशा उमेदवारांची नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. परंतू कृषि विषयातील उच्च शैक्षणिक अर्हता आणि कृषि विषयक कामाचा अनुभव किंवा कृषि पद्धतीचे व्यवसायाचे ज्ञान व ग्रामीण जीवनाचा अनुभव असेल अशा उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.

  • विस्तार अधिकारी (शिक्षण), (वर्ग३ श्रेणीर)  कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.ए./बी.कॉम./ बी.एस.सी. ही पदवी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.एड. अथवा समकक्ष पदवी | किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केली असेल आणि ज्यांना मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अध्यापक विद्यालयातील शासनमान्य पदावरील सक्षम प्राधिकाऱ्याने वैयक्तीक मान्यता दिलेला किमान तीन वर्षाचा अध्यापनाचा किंवा प्रशासनाचा अनुभव आहे. असे उमेदवार

  • विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – संविधिमान्य विद्यापिठाची विज्ञान, कृषि, वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करीत असतील किंवा ज्यांना नमुना सर्वेक्षण करण्याचा अनुभव असेल, किंवा पदवी व अनुभव दोन्ही असतील असे उमेदवार परंतु, अशा विषयांपैकी एका विषयाची स्नातकोत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल

  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा एक वर्षाचा पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार संविधीमान्य तत्सम खालील पाठ्यक्रम १) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या एक वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा २) आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन (वास्तुशास्त्रीय आरेखक), किंवा ३) कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) किंवा ४) आरेखक (स्थापत्य) हा दोन वर्षाचा पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा ५) सैनिकी सेवेतील बांधकाम पर्यवेक्षकाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी धारण करीत असतील असे उमेदवार

अनुभव

१. वरील सर्व पदाच्या मूळ कागदपत्रे तपासणीवेळी उमेदवाराने सादर करावयाच्या अनुभव प्रमाणपत्रामध्ये उपरोक्त नेमणूकीकरीता अर्हता व नेमणूकीच्या पद्धतीमध्ये नमूद अनुभवामधील प्रशासकीय कर्तव्ये व जबाबदाऱ्या याचे स्वरूप असलेला अनुभव नमूद करणे आवश्यक आहे. तसेच अनुभव सिद्ध करणारे दस्तऐवज सादर करणे आवश्यक राहील.

२. महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक एसआरच्ही-२००४/प्र.क्र.१०/०४/१२. दि. ०३/०७/२००४ अन्वये नियुक्तीसाठी विहित केल्यानुसार अनुभव ग्राह्य धरणेत येईल.


जिल्हा परिषद अहमदनगर मध्ये विविध “गट क” पदांकरीता नवीन 937 जागांसाठी सरळसेवा भरती २०२३. Zilha Parishad Ahmednagar Recruitment 2023

हे पण वाचा :-

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

पती-पत्नी दोघांनाही PM किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळणार का ? 

IDBI Bank Recruitment 2023 POST 1036 जागांसाठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख 07-07-2023

Pdf book Download 1 to 12 Standard 1 ली ते 12 वि पर्यंतचे सर्व पुस्तके pdf स्वरुपात डाऊनलोड करा एका मिनिटात.

Maharashtra Talathi Bharti 2023 महाराष्ट्र तलाठी ४६४४ जागांसाठी भरती जाहीर.

sukanya samriddhi yojana समृद्धी सुकन्या योजनेतून मुलींसाठी मिळु शकतात 44 लाख रुपये पहा योजना नवीन रूपात-2023

fish medicine for asthma medication-2023 जिवंत मासा घशात सोडून कसा केला जातो दमा कायमचा बरा

Post a Comment (0)
Previous Post Next Post